ताज्या घडामोडी
श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक हटविला उच्च न्यायालयाचा निर्णय

फलटण प्रतिनिधी- फलटण तालुक्याची सहकार विभागातील महत्त्वाची अर्थवाहीनी समजला जाणारा व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे यांच्या अथक प्रयत्ना मुळे आर्थिक अडचणीतून बाहेर आलेला फलटण तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजला जाणारा श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी आंबेकर मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसा त्यांनी कार्यभार देखील स्वीकारला होता.




