ताज्या घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमदारांची साप्ताहिक बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न:आ.श्रीमंत रामराजे यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी

फलटण प्रतिनिधी- नुकतीच नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमदारांची साप्ताहिक बैठक देवगिरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल २८ जानेवारी रोजी पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, इत्यादी मान्यंवर जेष्ठ नेते मंडळी यावेळी उपस्थित होती.



