फलटण प्रतिनिधी- फलटण शहर पोलीस स्टेशनने विविध गुन्हे अंतर्गत जप्त केलेले वाहनांचे निर्गतीकरण करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे हेमंतकुमार शहा म्हणतात की, विविध गुन्हेअंतर्गत ज्या कोणाची वाहने फलटण शहर पोलीस स्टेशनने जप्त केलेली आहेत. अशा वाहन मालकांनी आपल्या कागदपत्रासह १० दिवसाच्या आत फलटण शहर पोलीस स्टेशनची संपर्क करावा तसेच सातारा जिल्ह्यातील भंगार व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत भंगार व्यावसायिकांनी आपल्या नाव परवाना, नंबरसह उपलब्ध कागदपत्रासह फलटण शहर पोलीस स्टेशनला १० दिवसात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क
पो. नि. – हेमंतकुमार शहा
मो. नं. – 77 57 82 77 44
स.पो. उपनिरीक्षक –
दिपक साळुंखे
मो.नं. – 98 50 54 35 27
Back to top button
कॉपी करू नका.