फलटण प्रतिनिधी- छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज, महाराणी सईबाई श्रीमंत निंबाळकर घराणे स्वराज्य रथ सोहळ्याचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले तसेच श्रीमंत सईबाई महाराज यांचे व वंशज श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर केंद्रीय मंत्री मोहोळ इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
मिरवणुकीच्या प्रारंभी रथामधील छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई महाराज यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई महाराज यांच्या मिरवणुकीस लाल महल येथून शिवछत्रपतींचे वंशज खासदार छत्रपती श्री. उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर
इ.मान्यवरांच्या शुभहस्ते शिवज्योत चेतवून या मिरवणुकीस शुभारंभ करण्यात आला. लाल महल येथून सुरू झालेले मिरवणूक एस.एस.पी.एम.एस. शिवाजीनगर पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून या समारंभाची सांगता करण्यात आली. यावेळी मैदानी खेळांची प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचा संयोजकाच्या वतीने सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समितीचे संस्थापक अमित गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.