फलटण प्रतिनिधी- विदर्भातील मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात आज २० फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराजांचा प्रगटदिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर फलटण येथील डी.एड. चौकामधील पॉकेट कॅफे येथे संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सद्गुरु उद्योग समूहाचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेविका सौ. मधुबाला भोसले, फलटण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. वैशाली चोरमले, सातारा जिल्हा अम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, अजयकुमार शितोळे रावसाहेब,

कॉन्ट्रॅक्टर सतीश शेडगे, शिवसेनेचे युवा नेते विराज खराडे, तेजसिंह भोसले, विक्रमभैया कदम, हेमंत भोसले, सुरेश शिंदे, युवा उद्योजक विशालशेठ कणसे,सौ. वृषाली कणसे ज्येष्ठ उद्योगपती नारायण जेठवाणी, सौ. पूजा जेटवानी, सौ. आरती जेटवानी,सौ. गीता जेटवानी, सौ. संगीता शिंदे, सौ. कीर्ती रुपनवर, मनसेचे मनसेचे युवराज शिंदे, अविनाश शेवाळे, दिलीपशेठ रुपनवर, राजू रुपनवर, निखिल डोंबे, विजय तावरे इत्यादी मान्यंवर उपस्थित होते.

सकाळी ७.३० ते १०.३० या दरम्यान राहुल भोई व अस्मिता भोई यां दाम्पत्यांच्या शुभहस्ते अभिषेक व महापूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर श्री क्लासेसचे संचालक किरकिरे सर यांनी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सादर केला.

दुपारी १२ वाजता संत श्री. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या चरणी पुष्पवृष्टी करण्यात आली. श्री. संत गजानन महाराज यांची आरती फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले व दादासाहेब चोरमले या दांमपत्यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

त्यानंतर १ ते ३.३० वाजेपर्यंत महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी परिसरातील व शहरातील असंख्य भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला गर्दी केल्याचे दिसून आले व महाप्रसादाचा लाभ घेतला.

खरंतर संत गजानन महाराजांचा जन्म कधी आणि कुठे झाला हे जरी अज्ञात असलं तरी संत गजानन महाराज हे २३ फेब्रुवारी १८७८ अर्थात माघ वद्य सप्तमीला शेगाव येथे भक्तांना पहिल्यांदा दिसले.
तो दिवस गुरुवारचा होता. आणि तेव्हा पासून संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही प्रकट दिन हा गुरुवारी आल्यामुळे यंदाच्या प्रकट दिनाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले होते.
या कार्यक्रमासाठी विशेष करून अजय शितोळे रावसाहेब व राहुल भोई यांनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button
कॉपी करू नका.