ताज्या घडामोडी
ताथवडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत आरोग्य, कर्करोग, शुगर इ. तपासणी शिबिराचे आयोजन – ला.जगदिश करवा

फलटण प्रतिनिधी – लायन्स क्लब, फलटण, ऑन्को केअर ट्रस्ट, ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर, शेंद्रे आणि आरोग्य विभाग, सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत फलटण तालुक्यातील ताथवडा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत आरोग्य, कर्करोग, शुगर इ. तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष ला. जगदीश करवा यांनी दिली आहे.




