फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा.ना.राहुल नार्वेकर यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आ. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी दिल्या शुभेच्छा

याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बापूराव गावडे उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांचे जेष्ठ जावई असून एकेकाळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर होते तर त्याचवेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर होते.
त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये सासरे जावई दोन्ही विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती असल्यामुळे हा एक चांगला योगायोग महाराष्ट्राला पहावयास मिळाला होता.
Back to top button
कॉपी करू नका.