फलटण प्रतिनिधी- समता घरेलू महिला कामगार संघटनेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना प्राप्त करून देत असते असे प्रतिपादन समता घरेलू महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा सौ कल्पना मोहिते यांनी केले.
समता महिला घरेलू कामगार संघटना व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सातारा जिल्हा ॲमम्युचर खो – खो संघटनेचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, निवृत्त उपजिल्हाधिकारी देशमुख साहेब, महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुपर्णा अहिवळे, ॲड. कांचन खरात इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पुढे सौ कल्पना मोहिते म्हणाल्या की समता महिला घरेलू कामगार संघटनेच्या माध्यमातून ज्या महिला घरकाम करीत असतात त्या महिलांसाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते व शासनाच्या विविध योजना त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहत असून महिलांना त्यांचे अधिकार समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न राहिला असल्याचेही शेवटी सौ मोहिते यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी विविध महिलांचा महिला दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.