फलटण प्रतिनिधी – संगिनी फोरम ही सामाजिक, सांस्कृतिक व महिला क्षेत्रांमध्ये प्रशसनिय काम करणारी सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हे निश्चितच संगिनी फोरमचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्योतीचंद भाईचंद सराफ अँड. सन्स. प्रायव्हेट लिमिटेडच्या सौ.पल्लवी शहा यांनी केले.

ज्योतीचंद भालचंद सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड व संगिनी फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून फलटण नगर परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. वैशालीताई चोरमले, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सविता जोशी, अरिहंत टीव्हीएस च्या पूजा दोशी, संगिनी फोरमच्या दीक्षा सौ. निना कोठारी, संगिनी फोरमच्या अध्यक्ष सौ अपर्णा जैन, सचिव प्रज्ञा जोशी, खजिनदार सौ. मनीषा घडिया, उपाध्यक्ष सौ. मनीषा व्होरा, माजी सचिव दीप्ती राजवैद्य व सौ. पौर्णिमा शहा इत्यादी मान्यवर महिला याप्रसंगी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना पुढे सौ. पल्लवी शहा म्हणाल्या की, आज-कालच्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना दिसत असून शासनाच्या वतीने महिलांना सर्वच क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात महिला आघाडीवर राहून काम करीत असताना दिसत असल्याचेही शेवटी म्हणाल्या.
महिला दिनाचे औचित्य साधून सौ. इंदुमती मेहता, सौ. वैशालीताई चोरमले, सौ मंगल दोशी, सौ स्मिता शहा, श्रीमती अक्काताई उपाध्ये, सौ. विद्या चतुर, सौ. चांदणे माळवे, सौ. मनीषा नागावकर, जिल्हा समन्वयक अधिकारी कुमारी साक्षी पवार सौ.अपर्णा गुजराती, वैशाली शिंदे, सौ.कल्पना बेडके, कुमारी साक्षी गायकवाड, सौ. भारती खलाटे, सौ. अर्चना गांधी, प्रा. डॉ. सौ. माधुरी दाणीन, सौ संगीता सबसगी इत्यादी महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी सौ. प्रज्ञा दोषी, सौ. मनीषा घडियी यांचाही सत्कार करण्यात आला.

बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाल्याबद्दल संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला सौ.दीप्ती राजवैद्य सूत्रसंचालन केले.
सौ. प्रज्ञा दोषी यांनी आभार मानले श
Back to top button
कॉपी करू नका.