ताज्या घडामोडी

काल्पनिक कादंबरीतुन बहुजन मराठ्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर फौजदारी करणार – श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर

पुणे (प्रतिनिधि) : दिनांक ७ मार्च २०२५ रोजी शंभुपत्नी महाराणी येसुबाईंचे माहेरकडील स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याच्या वंशजांनी सातारा जिल्ह्यातील फलटण संस्थांनचे वारसदार श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन वादग्रस्त छावा चित्रपटासह राजेशिर्के व अन्य तेजस्वी मराठा घराण्याच्या इतिहासात होत असलेल्या खोडसाळपणा वर सविस्तर चर्चा केली. यावेळी खोट्या इतिहासातून बहुजन मराठ्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

बैठकी दरम्यान दिपक राजे शिर्के व रघुनाथ राजे यांच्या झालेल्या चर्चेत सध्या शिव-शंभुकालीन इतिहासाच्या विकृतीकरणास जबाबदार असणारे मंडळी तसेच मराठ्यांची प्रतिमा मलिन करणारे, मुद्दाम खोटा इतिहास पसरविणाऱ्या , लिहिणाऱ्या सर्व नालायक विकृत कादंबरीकार, पुस्तक लेखक, मालिका निर्माते, चित्रपट निर्माते दिग्दर्शक, नाटककार, महानाट्य निर्माते यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निश्चित झाले.

पूर्वगृहदुषीत असलेल्या बखरीचा आधार घेऊन तसेच मनातील काल्पनिक इतिहासाची भर टाकून निर्माण झालेल्या काल्पनिक कादंबरी द्वारे ज्याप्रकारे मराठा नात्या-गोत्यात माती कालवली जाते व अशा मोठ्या चित्रपटातून होत आहे याविरोधात कादंबरी लेखक, प्रकाशक व चित्रपट दिग्दर्शकांना कोर्टात खेचण्याचा इशारा श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी दिला. हा फक्त राजे शिर्के घराण्याचा विषय नसून समस्त मराठा समाजाला संपविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याविरोधात लवकरच फौजदारी खटला दाखल करणार आहेत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक वेळी नवनवीन घराण्याला बदनाम करून मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी वंशज दिपक राजेशिर्के, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, वकील सचिन राजे शिर्के, भूषण राजेशिर्के, लक्ष्मीकांत राजे शिर्के, भारत राजेशिर्के,  नवनाथ राजे शिर्के, चेतन राजेशिर्के, अमोलजी पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उस्थितीत होते.
जय शिवराय जय सईबाई
जय शंभुराजे जय येसुबाई

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.