फलटण प्रतिनिधी- काल फलटण येथील डीएड चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वतीने सभासद नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फलटण येथील युवा नेते विराज सोनवलकर यांची तालुका सरचिटणीस पदी तर फलटण तालुका राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवृत्ती खताळ यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खा. नितीन पाटील, फलटण कोरेगाव मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, महानंदाचे माजी व्हाईस चेअरमन डि. के. अण्णा पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांनी विराज सोनवलकर व निवृत्ती खताळ यांना निवडीची पत्रे प्रदान केली.
त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.