फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – अभूतपूर्व पावसामुळे फलटण तालुक्यामध्ये व सातारा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आपणाला कोणतीही मदत लागली तर कधीही रात्री अपरात्री आम्ही उपलब्ध आहोत असे व्हाट्सअप व्हॉइस मेसेज द्वारे श्रीमंत रामराजे यांनी कळविले आहे.
या मेसेज द्वारे श्रीमंत रामराजे पुढे म्हणतात की, फलटण तालुक्यामध्ये अथवा सातारा जिल्ह्यामध्ये कोणालाही कोणतीही अडचण निर्माण झाली तरी मला कधीही फोन करावा करावा व अडचण सांगावी मी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत संजीवराजे स्वतः जातीने फिरत आहेत ते देखील आपली अडचण दूर करू शकतात आज मी फलटणमध्ये येत आहे. तरी आपल्या अडचणीसाठी सदैव आम्ही सर्व राजे कुटुंब उपलब्ध आहोत. अशा आशयाचा व्हॉइस मेसेज करून श्रीमंत रामराजे यांनी तालुक्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Back to top button
कॉपी करू नका.