ताज्या घडामोडी

फलटण मध्ये लवकरच एन.डी.आर.एफ. तुकडी तैनात – श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – सध्या फलटण तालुक्यामध्ये गेल्या ४ दिवसापासून ग्रामीण भागात शहरी भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबाची घरे पाण्यात अडकली आहेत याचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी एन.डी.आर.एफ. विभागाला संपर्क करून १ तुकडी फलटणमध्ये बोलावली असून ती तुकडी लवकरच फलटण तालुक्यातील सस्तेवाडी या भागामध्ये कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी दाखल होणार असल्याची माहिती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

फलटण तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य असा मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने सर्व दळणवळण व्यवस्था बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
तसेच फलटण शहरातील बाणगंगा नदीला महापूर आला असून शनीनगर भागातील अनेक घरे पाण्याखाली गेली असून ४ चाकी वाहने सुद्धा पाण्यामध्ये बुडाली आहेत. या भागातील लोकांचे स्थलांतरण बाजारे शाळेमध्ये करण्यात आले आहे. तसेच सातत्याने पाण्यामध्ये होणारी वाढ लक्षात घेता व याचे गांभीर्य ओळखून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एनडी एफ आर च्या जवानांना पाचारण केले आहे.
तसेच याबाबतची ग्रामीण भागातून अधिक माहिती घेतली असता परिस्थिती खूप गंभीर असून ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. यासाठी तात्काळ सूचना देऊन एन. डी. आर. एफ. ची तुकडी तैनात करण्यात येत असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले आहे. 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.