ताज्या घडामोडी
महसूल प्रशासनावर मोठी जबाबदारी अध्याप संकट टळले नाही सतर्क राहण्याची आवश्यकता – तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – गेली चार-पाच दिवस फलटण तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसाची झळ मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला बसली आहे. आज जरी थोड्या प्रमाणात पावसाने उघडीप दिली आहे असे वाटत असले तरी अद्याप संकट टळलेले नाही. महसूल प्रशासनावर मोठी जबाबदारी असून पुढील परिस्थिती हाताळण्यासाठी आमचे प्रशासन सतर्क असल्याची माहिती फलटणचे कर्तव्यदक्ष व कार्यक्षम तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.

त्यामुळे फलटण शहरातील शनीनगर, दत्तमंदिर परिसरातील, मलटण परिसरात व मंगळवार पेठ परिसरातील अनेक भाग पाण्याखाली गेला होता. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. अक्षरशा चार चाकी गाड्या पाण्यात डुबत असताना या परिसरातील लोकांचे स्थलांतर करण्यासाठी फलटणचे महसूल प्रशासन उपविभागीय अधिकारी आंबेकर मॅडम, तसेच फलटणचे कार्यक्षम तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन ॲक्शन मोडवर राहून काम करीत असलेले दिसून आले. त्यांच्या मदतीला सर्वच राजकीय नेतेे मंडळीं देखील धावून आल्याचे दिसून आले.
अन्यथा अनेक रोगराईंना सामोरे जावे लागेल या सर्व गोष्टींसाठी प्रतिबंधात्मक काम करण्यासाठी योग्य त्या उपायोजना नगरपरिषदेच्या मदतीने राबवण्यासाठी आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी ॲक्शन मोडवर राहुन काम करु असेही शेवटी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव म्हणाले.

