फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – गेली चार ते पाच दिवस झाले फलटण तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीत फलटण शहरातील विद्युत व्यवस्था बंद पडल्यामुळे तात्काळ पुर्ववत करण्यासाठी फलटणची एम.एस.ई. बी.चे कार्यकारी अभियंता व उपअभियंता ननावरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ॲक्शन मोडवर राहून काम करीत असताना दिसून येत आहे.

पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शहरातील एम.एस.ई.बी. चे काही ठिकाणी पोल पडलेले आहेत. त्यामुळे शहरातील विद्युत व्यवस्था बराच काळ बंद पडली होती. ती विद्युत व्यवस्था तात्काळ काही तासांमध्ये पुरवत करण्यात ननावरे साहेब व त्यांच्या टीमला यश आले असून मलटण येथे पोल पडल्यामुळे मलटणची विद्युत व्यवस्था कालपासून बंद होती. हि विद्युत व्यवस्था युद्ध पातळीवर चालू करण्यासाठी एम.एस.ई.बी. ची टीम फिल्डवर राहून काम करताना दिसत आहे.
अशा या आपत्कालीत परिस्थितीत यापूर्वी अनेक अधिकारी आपले फोन बंद करून बसत मात्र आजच्या परिस्थितीत ननावरे साहेब यांनी दिवस-रात्र आपला फोन चालू ठेवून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.
Back to top button
कॉपी करू नका.