ताज्या घडामोडी

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह-मेळावा २१ वर्षानंतर सर्वजण भेटले एकमेकांना जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

न्यू इंग्लिश स्कूल निंभोरे ता.फलटण येथील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम

फलटण तालुक्यातील निंभोरे येतील न्यू इंग्लिश स्कूल निऺभोरे या हायस्कूलच्या सन २००३-०४ सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २१ वर्षानंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. माजी मुख्याध्यापक विष्णुपंत फडतरे, कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, भुजबळ सर, सौ.ढमाळ मॅडम बजरंग गोडसे सर आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभिक सकाळी १० वाजता सर्व मुले व मुली एकत्रित विद्यालयांमध्ये जमा झाली होती. विद्यालयाच्या आवारात प्रार्थना झाल्यानंतर सर्व मुले मुली पुन्हा एकदा २१ वर्षानंतर आप आपल्या बेंचवर जाऊन बसली मग खऱ्या अर्थाने तास सुरू झाले.

यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अभ्यासाचे धडे दिले. हा अनुभव शालेय जीवनातील जुन्या आठवणींना सुखद आनंद व उजाळा देणारा ठरला. दुपारची सुट्टी झाल्यानंतर
पुन्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक दुपारी १ वाजता फलटण येथील सेलिब्रेशन हॉटेलमध्ये एकत्रित आले.


या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य विष्णुपंत फडतरे म्हणाले की, शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारा हा क्षण एक आगळा वेगळा असून अशा कार्यक्रमामुळे आपणाला आपल्या जुन्या आठवणींचा उजाळा मिळतो व तो अनुभव एक आगळावेगळा आनंद देणारा ठरत असतो म्हणून अशा गेट-टुगेदर कार्यक्रमामुळे निश्चितच एक आगळी वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते.


यावेळी बोलताना कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले म्हणाले पुन्हा एकदा आपण २१ वर्षानंतर सर्वजण एकत्रित आलो आहे खरं तर हा क्षण मनस्वी सर्वांना आनंद देणारा असून संगणकीय युगामध्ये आपण सर्वच जण धावपळीच्या जीवनामध्ये

आपले जीवन जगत असताना वेगवेगळ्या ताणतणावाला सामोरे जात असतो विशेष करून मुली या आपल्या संसारामध्ये व्यस्त असतात आणि अशावेळी शालेय जीवनातील आठवणींना मिळणारा उजाळा आपणाला खूप मोठा आनंद देऊन जात असतो

आज आपल्या सर्वांच्या कडे जरी बक्कळ पैसा असला तरी हा आनंद मात्र मिळत नाही आणि नेमका हा आनंद आज या ठिकाणी आपण आनंदाचा अनुभव घेत आहात

अशा एकत्रित येण्यामुळे आपल्यातील सर्व मुला-मुलींना एकमेकांची मदत होत असते आणि या मदतीमुळे आपल्या जीवनातील अनेक क्लिष्ट प्रश्न सहजपणे एकमेकांच्या मदतीमुळे मार्गी लावले जातात आणि यासाठीच आपण या ठिकाणी एकत्रित येण्याचा निश्चय केला.

आणि या कार्यक्रमासाठी विशेष करून निलेश रणवरे सुशांत महाराज शारदा अडसूळ राजश्री यादव यांनी विशेष प्रयत्न केले यांचा

हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही शेवटी चोरमले सर यांनी सांगितले.

यावेळी अनेक मुला-मुलींनी आपल्या जीवनातील वेगवेगळे अनुभव आपल्या भाषणातून यावेळी कथन केले व जुन्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.


यानंतर सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी सुंदर भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत महाराज यांनी केले तर

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा अडसूळ, शारदा अडसूळ, राजश्री यादव, सुशांत महाराज, निलेश रणवरे, सुधीर मोरे, मनोज कांबळे व लक्ष्मण लांडगे इ. विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.