ताज्या घडामोडी

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र मोहिमेंतर्गत श्रीराम कारखाना कार्यस्थळावर ५५१ देशी झाडे लावणार हा मानसिंग पाटील

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण यांच्या संयुक्त सहभागाने श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण येथे ५५१ विविध देशी वृक्षारोपण व संवर्धन योजनेचा शुभारंभ नवरात्रोत्सवातील ८ व्या माळेला कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरीचे प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंगराव पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपन अभियान शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला असून केंद्र सरकार, राष्ट्रीय सहकारी साखर संघ दिल्ली आणि साखर आयुक्तालय पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व साखर कारखाने यांना हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र मोहिम राबविण्याचे आवाहन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील सर्व खाते प्रमुख व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते, या सर्वांच्या हस्ते एकेक देशी झाड लावण्यात आले.
“एक पेड माँ के नाम” वृक्षारोपन कार्यक्रमांतर्गत श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपले घरासमोर परिसरात अथवा शेतात एक झाड लावुन आपला कुटुंबियांसमवेत सेल्फी फोटो काढुन पाठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button