ताज्या घडामोडी
महाराष्ट्र महसूल खात्यातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती; केंद्राकडून मिळाला IAS दर्जा

मुंबई : महाराष्ट्रातील महसूल विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील १२ ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. त्यामुळे, हे १२ अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले आहेत.