परभणी प्रतिनिधी (विजय देवकाते) – नुकतीच पूर्णा तालुका भारतीय जनता पक्षाच्या कोषाध्यक्षपदी सचिन धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पुर्णा तालुका कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या प्रसंगी भाजप जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, धनगर समाज संघर्ष समिती प्रदेश अध्यक्ष अनंतराव बनसोडे, गंगाखेड विधानसभा प्रमुख बालाजी रुद्रवार , नारायण पिसाळ, लिंबाजी भोसले, इत्यादी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सचिन धोत्रे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.