फलटण: आस्था टाईम्स वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग फलटण आगाराच्या वतीने “श्रावण मास दर्शन यात्रेचे” आयोजन सवलतीच्या दरात करण्यात आले आहे. तरी इच्छुक महिला भगिनी भाविक भक्तांनी श्रावण मास दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख राहुल वाघमोडे यांनी केली आहे.

राहुल वाघमोडे पुढे म्हणतात की, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, अष्टविनायक दर्शन, कोल्हापूर, आदमापूर, ज्योतिबा दर्शन परत
शनिशिंगणापूर, शिर्डी दर्शन परत, थेऊर, भीमाशंकर दर्शन परत, साडेतीन शक्तीपीठ दर्शन, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, शेगाव इत्यादी धार्मिक स्थळांसाठी श्रावण मार्गदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी इच्छुक महिला भगिनी भाविक भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी फलटण एस.टी. आगारात चौकशी करावी असे आवाहन सहाय्यक वाहतुक निरीक्षक सुखदेव अहिवळे यांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.