फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांची बदली पुणे महानगरपालिकेत उपायुक्त या पदावर झाली असून ते लवकरच या पदावर रुजू होत आहेत.
आस्था टाईम्स प्रतिनिधीशी बोलताना निखिल मोरे म्हणाले की मागील दीड वर्षापासून फलटण नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करताना फलटणमधील सर्वच थरातील लोकांची खूप चांगली मदत आणि मार्गदर्शन मिळत राहिले तसेच शहरातील अनेक पत्रकार व नगरपरिषदेचे कामगार व अधिकारी यांचे महत्त्वाचे सहकार्य राहिले असे सांगून ते म्हणतात आपण दिलेल्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचेच खूप खूप आभार
Back to top button