फलटण -आस्था टाईम्स वृत्तसेवा : राज्यात २४७ नगरपरिषद व १४७ नगरपंचायतीच्या निवडणुका केली चार वर्षे लांबणीवर पडलेल्या आहेत अखेर या निवडणुकाना मुहूर्त लागला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आतख ६ ऑक्टोबर रोजी राज्यातील २४७ नगर परिषदा व १४७ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडणार असल्याची माहिती नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी दिली आहे.
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या दोन प्रतिनिधींना या आरक्षण सोडती मध्ये सहभागी होत आहे येणार आहे अशी माहिती प्रियांका कुलकर्णी यांनी दिली आहे.
फलटण नगरपरिषद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार याकडे शहरातील नागरिकामध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.