आपला जिल्हा

मुधोजी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

(फलटण /प्रतिनिधी)- फलटण एज्युकेशन, सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. पंढरीनाथ कदम व मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रा.फिरोज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राज्यघटनाकर होते.

त्यांच्या संविधानात्मक कामाचा अनेक राष्ट्राने आदर्श घेऊन आपल्या राष्ट्रांचे संविधान तयार केले. कोलंबिया विद्यापीठांमध्ये त्यांच्या संशोधनामुळे त्यांची प्रतिमा मोठ्या डौलात तेथे लावलेली आपणाला पाहायला मिळते, जागतिक स्तरावरील अनेक उपेक्षित, वंचित समूहानी त्यांच्या मानवमूलभूत हक्क व अधिकारांच्या मानवतावादी लढ्याचा आदर्श घेऊन गुलामगिरीतुन मुक्तता करून घेतली. असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम म्हणाले,डॉ. आंबेडकरांच्या मुळे भारतीय महिलांना अमेरिकेच्या अगोदर मतदानाचा अधिकार प्राप्त झाला . त्यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल तयार करून तिला सर्वतोपरी अधिकार दिले,हे आंबेडकरांचे मोठे क्रांतिकारी कार्य असून आजच्या काळात पी.एच.कदम व प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये प्राध्यापक फिरोज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांच्या संविधानात्मक कामाचा अनेक राष्ट्रानी आदर्श घेऊन आपल्या राष्ट्रांचे संविधान तयार केले. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठांमध्ये त्यांच्या संशोधनामुळे त्यांची प्रतिमा मोठ्या डौलात लावलेली तेथे आपणाला पाहायला मिळते, असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे भारतीय महिलांना अमेरिकेच्या अगोदर मतदानाचा अधिकार प्राप्त झाला . त्यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल तयार करून तिला सर्वतोपरी अधिकार दिले.हे आंबेडकरांचे मोठे क्रांतिकारी कार्य असून आजच्या काळात त्यांच्या विचारांचा आदर्श सर्वांनी जोपासला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभारही डॉ.प्रशांत शेट्ये यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button