आपला जिल्हा

बरड गटाच्या जि.प.सदस्या सौ. वैशालीताई कांबळे यांची समाजकल्याण समितीवर बिनविरोध निवड

(जावली /अजिंक्य आढाव )– बरड जिल्हा परिषद गटाच्या अभ्यासू जि. प. सदस्या सौ. वैशालीताई संदीप कांबळे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सौ. कांबळे या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध विकासकामांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची या महत्त्वाच्या समितीवर निवड करण्यात आली असल्याचे मानले जात आहे.

त्यांच्या निवडीमुळे समाजकल्याण विभागाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सौ वैशाली कांबळे यांच्या निवडीबद्दल साताऱ्याची पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण व सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख चंद्रकांत जाधव इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button