(जावली/अजिंक्य आढाव)- सध्या फलटण पूर्व भागातील जावली,मिरढे ,बरड सह परिसरात व्हायरल आजाराने डोके वर काढले असून अनेक रुग्ण संख्या वाढली आहे. या मधे ताप , थंडी, सर्दी,खोकला,घशाचा संसर्ग पांढरी पेशी या आजाराने प्रकोप केला आहे.उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे.बदलत्या ऋतू हवामानामुळे ग्रामीण भागातील बहुतांश घराघरांत व्हायरल आजाराचे रुग्ण आढळतं आहेत.
पण आरोग्य विभागाला यांची थोडीही माहिती नाही त्यामुळे आरोग्य विभागा निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे,असे रुग्णांना कडून बोलण्यात येत आहे.वेळी या आजारांबाबत जनजागृती करुन ग्रामीण भागात उपचार पद्धती विषयक माहिती देण्यात गरज भासत आहे.या मुळे गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.