ताज्या घडामोडी

जावली ता फलटण येथील बेंदुर सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

(जावली/ अजिंक्य आढाव)- जावली सह परिसरात बेंदूर सण शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शेतीमध्ये वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या आपल्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या निमित्ताने बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

बेंदूर हा शेतकऱ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा आणि भावनिक सण मानला जातो. आधुनिक काळात ट्रॅक्टरचा वापर वाढला असला, तरी बैलांप्रतीची ही पारंपरिक श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना आजही चुयेकरांनी जपली आहे.मात्र काही वर्षांपासून मिरढे आणि जावली गावात ट्रॅक्टरची संख्या जास्त असल्याने हे ट्रॅक्टरचे गाव म्हणून ओळखले जाते.

“असं म्हणतात की कष्टा शिवाय मातीला आणि बैला शिवाय शेतीला पर्याय नाही.”

 

यावर्षी बैलगाडा मालक यांनी मोठ्या संख्येने आपली बैलांना सजवून अंगावर नाव देऊन भव्य दिव्य डीजेच्या तालावर आणि हलगी च्या वाद्या वर जावली गावातील सिद्धानाथ मंदिरात दर्शनासाठी बैल मालक – मच्छिंद्र निंबाळकर तसेच कुणाल चव्हाण,अक्षय आढाव, महिपत शिंदे, दिंगबर मोरे, निखिल ढेंगळे आदी मिरवणूकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पुरणपोळी, कडबोळी (चकल्या) आणि इतर गोड पदार्थांचा नैवेद्य खाऊ घातला. देवघरात मातीच्या बैलांची मनोभावे पूजा करण्याची प्रथा आजही श्रद्धेने पाळली जाते.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.