ताज्या घडामोडी

पणन विभागाने सुपर मार्केट गाळा भाडे कमी करण्याचे निर्देश दिल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीस मान्य – श्रीमंत रघुनाथराजे

काही व्यापाऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीस बदनाम करण्याचा डाव

फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या सुपर मार्केट गाळा भाडेवाढ ही माननीय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशास अधीन राहून केलेली आहे.अशा हि परिस्थितीत पणन विभागाने सुपर मार्केट मधील गाळे भाडेवाढ कमी करणे बाबत निर्देश दिल्यास फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाडे वाढ कमी करेल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की सुधारित भाडेवाढ व  डिपॉझिट च्या अंमलबजावणीच्या बाबतीत ज्या गाळे धारकांचे करार संपुष्टात आलेले आहेत अथवा अद्याप यांचे करार नोंदविण्यात आलेले नाहीत त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविलेल्या दराने सुधारित भाडेवाढ व वाढीव डिपॉझिट लागू करावे परंतु ज्या गाळेधारकांचे करार अद्याप संपुष्टात आलेले नाहीत त्यांच्या बाबतीत करारातील तरतुदीनुसार भाडेवाढ याबाबत कार्यवाही करण्यात यावी तसेच पोट भाडे करू बाबत बाजार समितीने कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी असे माननीय संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे पुढील गाड्या करता सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवलेल्या दरानुसार मासिक भाडे रक्कम रुपये २८३३ व मागील गाड्या मासिक भाडे १५३३ संकलित कर व जीएसटी वगळून लागू करावे असे निर्देश पणन संचालनालय यांनी दिले होते असे सांगून पुढे श्रीमंत रघुनाथ राजे म्हणतात की, कृषी उत्पन्न बाजार समितीस शासन कोणतेही एक रुपयाचे अनुदान देत नाही. अशा परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करीत असतानाच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या असून मार्केट कमिटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी ५ पेट्रोल पंप सुरू केले आहेत. गाड्यांचे भाडे हे एकमेव मुख्य उत्पन्न कृष्ण बाजार समितीला आहे मात्र काही गाळेधारक हे स्वतः गाळा वापरत नसून त्यांनी त्यांचे गाळे हे पोटभाडे करू यांना दिले असून त्यांच्याकडून सदर गाळेधारक जादा भाडे घेत आहेत व समितीस निम्मे  भाडे भरत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न मार्केट कमिटीच्या माध्यमातून सुरू झाल्यामुळे काही गाळेधारक यांनी बेकायदेशीर रित्या संघटित होऊन बाजार समितीच्या हिताच्या विरोधात काम सुरू केले आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पणन विभागाच्या स्मार्ट रँकिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये १९ व्या नंबरला असून कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकावर असताना देखील केवळ द्वेषाने पेटलेली काही मंडळी ही षडयंत्र करीत आहेत. निवडक गाळेधारक बाजार समिती विरुद्ध सोशल ब्लॅकमेलिंग तसेच फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी हितास बाधा आणून प्रतिमेस धक्का पोचवित  असल्याचे सांगून श्रीमंत रुग्णात राजे म्हणाले फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यामध्ये उत्कृष्ट कामकाज करीत असल्यामुळे सलग ३ वर्षे पुरस्कार मिळविण्यास पात्र ठरली आहे.
असून सदर सुपर मार्केट गाळेचे बाबतीत यापेक्षा कमी भाडे घेणे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत वैधानिकदृष्ट्या आर्थिक नुकसान करण्याचे ठरेल असे वाटते.

मात्र अशा परिस्थितीतही शासनाच्या पणन विभागाने गाळे भाडेवाढ कमी करण्याबाबत आदेश दिल्यास ते आम्हास मान्य राहतील असेही शेवटी श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.