(विडणी/सतीश कर्वे)- उत्तरेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेजच्या वतीने मुला मुलींसाठी सुरु केली स्कुल बस शाळेच्या उपक्रमा बद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
विडणी गांव वाडी वस्तीवर विखुरले असून गावाचे ३ ते ४ किलोमीटर क्षेञफळ आहे.या ठिकाण वरुन गावात शाळेला मुला मुलीना येण्या जाण्या साठी अडचण येत असायची काही पालक मुलीना शाळा थांबवत होते.या बाबत उत्तरेश्वर विद्यालय व ज्यु,कॉलेजच्या वतीने सर्वेक्षण केले. सदर बाबी लक्षात आल्यावर गावातील एकही मुलगा शाळे पासून वंचित राहता कामा नये.या उद्देशाने उत्तरेश्वर विद्यालय व ज्यु कॉलेजच्या वतीने ग्रामीण भागात प्रथमच स्कुल बस सुरु केल्याने मुलांचा शाळेला जाण्यासाठी उत्साह वाढला आहे.पालक वर्गातून ही शाळेच्या उपक्रमा बद्दल स्वागत करणेत आले.
यावेळी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे सोनबा अदलिंगे,शिवराज शिंदे,विलास अभंग,वामन शेंडे,अशोका अभंग, श्रीनिवास पवार, विठ्ठल नाळे, संस्थेचे अध्यक्ष हनुमंतराव अभंग सचिव राजीव पवार उपाध्यक्षा डॉ.सुचिता शेंडे, बाळासाहेब लाड लक्ष्मण भुजबळ अनिल अबदागिरे बशीर शेख वैभव पवार,मारुती नाळे प्राचार्य शुभांगी शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो – उत्तरेश्वर हायस्कुल व ज्यु.कॉलेज मध्ये नविन स्कुल बसचे उदघाटन करताना प्रमुख मान्यवर (छाया – सतिश कर्वे)
Back to top button
कॉपी करू नका.