आरोग्य व शिक्षण

राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जावली येथे NEET, JEE & MHT -CET परिक्षेच्या फाऊंडेशन बॅच सुरू

(जावली/अजिंक्य आढाव)- अल्पावधीतच उत्तम शैक्षणिक दर्जा बरोबरच आणि कला क्रीडा क्षेत्रात नाव लैकिक मिळावलेलं राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जावली मधे नाविन्य पूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

सध्याच्या युगात प्रत्येक पालकाला आपला मुलगा मुलगी उच्च शिक्षणासाठी धडपड करताना आपणास दिसत असतात अशातच प्रा. अमोल चवरे यांच्या वतीने जावली ता फलटण येथील रॉयल इंग्लिश स्कूल& ज्यू कॉलेज जावली येथे डॉक्टर, इंजिनियर होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी जावली मध्ये  NEET,JEE & MHT-CET या परीक्षेच्या फाउंडेशन बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 जुलै पासून इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅचेस सुरू करण्यात आल्या आहेत.

यामध्ये NEET परीक्षेसाठी बायोलॉजी विषयासाठी बायोलॉजी विषयाचे तज्ञ इस्माईल शेख सर मार्गदर्शन करणार आहेत, फिजिक्स विषयासाठी विशाल रसाळ सर मार्गदर्शन करणार आहेत,JEE परीक्षेसाठी मॅथ्स विषयासाठी प्रवीण मदने सर तसेच केमिस्ट्री या विषयासाठी स्वतः अमोल चवरे सर सहभागी होत उत्तम मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या कांचन चवरे मॅडम यांनी दिली.कार्यक्रमावेळी सर्व शिक्षक , पालक विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.