आपला जिल्हा
शनिनगर फलटण येथे पतंग स्पर्धा उत्साहात संपन्न
प्रथम क्रमांक नितीन निंबाळकर यांचा तर प्रथमेश पालकर द्वितीय क्रमांक


स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी नगरसेवक पै. सलीम भाई शेख, माजी नगरसेवक किशोरसिंह ना. निंबाळकर, माजी नगरसेवक किशोर गुड्डू पवार, भाऊसाहेब कापसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी चंद्रकांत पवार, योगेश शिंदे व अमोल काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजक पै. पप्पू शेख यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत व सत्कार केला.
तर या स्पर्धा पार पाडण्यासाठी पै. पप्पू शेख, संजय कापसे, दत्ता जाधव, हर्षद शेख, जावेद डांगे, जफर आतार, रोहिदास पवार, वसीम शेख, अनिल वाडकर, नरेश पालकर, अरुण आंबोले,गोटया राऊत, जावेद उर्फ सोन्या शेख, सनी पवार, नीती केश राऊत, नाईद शेख, इब्राहिम शेख, मोबेन शेख व रिजवान शेख, नंदू चवडके, बंटी हाडके साजिद डांगे, सोहेल डांगे, श्रीकांत पालकर, अबताब मणेर, अखिल डांगे, जनुद्दीन जहारी, गणेश कर्वे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.