ताज्या घडामोडी

माळेगावचं राजकारण तापलं, अजित पवार लुंगीवरून बोलले; चंद्रराव तावरे म्हणाले, तुमचा इतिहास काढला तर तुम्हाला पळता तरी येईल का..?

पणदरे आस्था टाईम्स -माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं राजकारण आता अधिकच तापत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर “सहकार बचाव शेतकरी पॅनल” च्या वतीने पणदरे येथे झालेल्या प्रचारसभेत माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आणि बोचऱ्या शब्दांत टीका केली. अजितराव गेले काही दिवस माझ्या लुंगीवर बोलत आहेत. इतके दिवस आम्ही जाऊ द्या म्हणत होतो. पण जर आम्ही जुने विषय काढायला सुरुवात केली, तर तुम्हाला पळता तरी येईल का..?” असा थेट सवाल करत त्यांनी जुन्या राजकीय घडामोडी उघड करण्याचा इशारा दिला.

तावरे पुढे म्हणाले, “तुम्ही लहान होतात, तेव्हापासून आम्ही राजकारणात आहोत. आमच्यासमोरच तुम्ही लहानाचे मोठे झालात. तुमच्या वयाएवढा काळ आम्ही सार्वजनिक जीवनात काढला आहे.” त्यांनी अजित पवारांच्या बालपणीच्या आठवणींना हात घालत टोमणा मारला, “तुम्ही लहान असताना तुमच्या गाडीत पेट्रोल असायचं की रॉकेल, हे पण आम्हीच सांगायचं का..?”
“साहेब रागावले की तुम्ही नॉट रीचेबल व्हायचा…”
अजित पवारांच्या शैलीवर टीका करताना तावरे म्हणाले, “साहेब रागावले आणि तुम्ही रूसलात की तुम्ही नॉट रीचेबल व्हायचा… त्यावेळी तुम्ही कुठे असायचा, काय करायचा याचेही आम्ही साक्षीदार आहोत. अनेक गोष्टी सांगता येतील, पण आम्ही संयम पाळतो. कारण राजकारणात काही गोष्टी लक्षात ठेवूनच बोलाव्या लागतात. मात्र आज तुमचं ‘नॉट रीचेबल’ होणं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. हे सगळं तुम्हीच विसरलाय आणि मला विस्मरण होत सांगता, ही कसली पद्धत..?
“पुन्हा सत्तेत आले, तर घोटाळे होणारच!”
तावरे यांनी सध्याच्या संचालक मंडळावरही गंभीर आरोप केले. “मागच्या पाच वर्षात संचालक मंडळाने किती घोटाळे केले हे सर्व सभासदांना ठाऊक आहे. हेच संचालक मंडळ पुन्हा सत्तेत आलं, तर आणखी घोटाळे होतील. आपला माळेगाव साखर कारखाना छत्रपती कारखान्यासारखा होईल याचं भान सभासदांनी ठेवावं.” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून साखर मोठ्या प्रमाणात भिजल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचे सांगत आहोत. मात्र नेत्यांनी साखर भिजलीच नाही असे सांगत निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. त्यांचे पदाधिकारी जेव्हा गोडावूनला गेले, तेव्हा त्यांनाही साखर भिजल्याचे पाहायला मिळाले. आता नेते म्हणतात की साखर भिजली, पण मोठ्या प्रमाणात नाही भिजली. असा यांचा सगळा कारभार आहे. त्यामुळे आताच हे शब्द फिरवत असतील तर पुढे काय होणार असा सवालही चंद्रराव तावरे यांनी उपस्थित केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.