ताज्या घडामोडी

ओबीसी आरक्षणासाठी तज्ज्ञांची समिती नेमा ओबीसी नेते मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई- ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकामध्ये राज्य सरकार ची बाजू मांडताना राज्य सरकारचे वकील, Attorney General यांना तांत्रिक मदत करणेसाठी ओबीसी अभ्यासक, वकील, आरक्षण तज्ञ यांची समिती गठीत करण्याची मागणी ओबीसी नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली.

यावेळी शेंडगे म्हणाले सदरच्या समितीत कोणाला स्थान द्यावे, अशी नावेही त्यांनी सूचित केली आहेत. या मागणीचे निवेदन प्रकाश आण्णा शेंडगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.

मुंबई उच्च न्यायालयात 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या Petition No. 4/2019 Balasaheb Asaram Sarate Vs. State of Maharashtra तसेच 22/2022 व 140/2022 या याचिका दाखल आहेत. या याचिकांसंबंधी राज्य सरकारच्यावतीने उच्च न्यायालयात १० डिसेंबरपर्यंत शपथपत्र दाखल करावयाचे होते. येत्या 3 जानेवारीला यावर सुनावणी आहे. त्यापूर्वी राज्याचे महाधिवक्ता यांना न्यायालयात ओबीसींची बाजू समर्थपणे मांडली जावी यासाठी आवश्यक तेथे सहकार्य करण्यासाठी ओबीसींमधील तज्ञांची, वकिलांची, ओबीसी आरक्षण अभ्यासकांची समिती नेमण्याबाबत २९ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार मराठा आरक्षण सल्लागार समितीच्या धर्तीवर अशाप्रकारची तज्ञ समिती नेमण्यात यावी अशी मागणी प्रकाश आण्णा शेंडगे यांनी केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.