फलटण प्रतिनिधी- साखरवाडी येथे मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्ट व कै. शेवंताबाई पवार वाचनालय व ग्रंथालय यांचे विद्यमाने व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, महमंदवाडी, पुणे यांचे सहकार्याने आयोजित केलेल्या नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन फलटण तालुक्याचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
कै. आर. बी. भोसले यांच्या स्मरणार्थ साखरवाडी विठ्ठल मंदिर पिंपळवाडी येथे आयोजित केलेल्या मोफत शस्त्रक्रिया, मोतीबिंदू तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी श्रीमंत अनिकेतराजे ना. निंबाळकर बोलत होते.
यावेळी महानंदा दूध डेरीचे संचालक डी. के. पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदेफलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अंकुश साळुंखे, फलटण दूध संघाचे संचालक तानाजी बिबे, शरदराव रणवरे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत रणवरे व सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भोसले, व्हॉइस चेअरमन चंद्रकांत जाडकर, मातोश्री विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन संजय भोसले, सचिव नितीन धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्षा सौ. रेश्मा भोसले, जे. के. भोसले, विष्णू भोसले, हनुमंत कदम, रवींद्र जगताप, संग्राम पवार, सचिन फडतरे, संतोष शेंडगे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे श्रीमंत अनिकेत राजे म्हणाले की, अशा शिबिराच्या माध्यमातून समाजातील अनेक गोरगरीब व सर्वसामान्य व्यक्तींना याचा लाभ होत असतो. त्यामुळे समाजातील अनेक सेवाभावी संस्थेने पुढे येवून साखरवाडी येथे विविध संस्थेने आयोजित केलेल्या शिबिराचा आदर्श घेऊन आरोग्यविषयी शिबिराचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत ही शेवटी श्रीमंत अनिकेत राजे यांनी व्यक्त केले.
शिबिरासाठी डॉ. शरद शिंदे व त्यांचे सहकारी तसेच डॉ. अनिकेत उघडे – पाटील वैद्यकीय अधिकारी व त्यांचा स्टाफ तसेच यश मल्टीस्टेट हॉस्पिटलचे डॉ. राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरात १५० लोकांची डोळयांची तपासणी करण्यात आली. ४३ लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी मोफत निवड करण्यात आली. अल्पदरात ५२ चषम्यांचे अल्पदरात वाटप करण्याचे निच्छित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे संयोजक व महानंदा डेअरी मुंबईचे माजी व्हाइस चेअरमन डी. के. पवार होते.