फलटण प्रतिनिधी – श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा सप्ताह व लायन श्री.दादासोा आप्पाजी शेंडे (अध्यक्ष,श्री संत सावतामाळी महाराज मंदिर ट्रस्ट,फलटण) यांचे 91 व्या वर्षपुर्ती समारोह निमित्त श्री संत सावतामाळी महाराज मंदिर ट्रस्ट,फलटण, लायन्स क्लब,फलटण, फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड सेंटर,फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत श्री संत सावता महाराज मंदिर, पहिला मजला, फलटण येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
श्री संत सावतामाळी यांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. सप्ताह काळात विविध धार्मिक, सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत सावतामाळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लायन श्री.दादासोा शेंडे यांच्या 91 व्या वर्षपूर्तीनिमित्त श्री संत सावतामाळी महाराज मंदिर ट्रस्ट,फलटण, लायन्स क्लब,फलटण व फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड सेंटर,फलटण यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन श्री संत सावतामाळी महाराज मंदिर ट्रस्ट,फलटणचे अध्यक्ष लायन दादासोा शेंडे, लायन्स क्लब,फलटणचे अध्यक्ष जगदिश करवा व फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड सेंटरचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत करवा यांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.