ताज्या घडामोडी

गोविंद मिल्क व मिल्क प्रॉडक्ट यांच्यावतीने ३१ डिसेंबरच्या निमित्ताने दूध वाटपाचे आयोजन

फलटण शहरातील युवक, व्यावसायिक, दुकानदार व टपरीधारक यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे- पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे

फलटण प्रतिनिधी- ३१ डिसेंबर मंगळवार रोजी फलटण येथे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., निकोप हॉस्पिटल, फलटण डॉक्टर असोसिएशन, फलटण नगरपरिषद आणि फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ३१ डिसेंबरच्या रात्री गोविंद दूध वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

“सुंदर फलटण,निरोगी फलटण व सुरक्षित फलटण” ही घोषवाक्य घेऊन ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या सामाजिक उपक्रमातून करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ते ६ या वेळेत ४ ठिकाणी गोविंद मिल्कच्या वतीने दुधाचे वाटप करून आरोग्यासाठी दुधाचा आहार किती आवश्यक आणि उत्तम आहे याचे महत्त्व पटवून देवून तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला यावेळी देण्यात येणार आहे.
फलटण शहरात खालील ठिकाणी दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.

*नाना पाटील चौक  सायं.५ ते ५.१५*

*आंबेडकर चौक सायं. ५.१५ ते ५.३०*

*डी. एड, चौक सायं. ५.३० ते ५.४५*

*महात्मा फुले चौक (सायं. ५.४५ ते ६.००*

या ठिकाणी फलटण शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान संयोजकांनी केले आहे. यावेळी फलटण शहरातील तरुण पिढीला आपल्या आरोग्यासाठी काय आवश्यक आहे. आणि व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत निकोप हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. जे. टी. पोळ युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या वेळी फलटण शहरातील नागरिकांची शांतता भंग होऊन त्यांना कोणताही त्रास होऊ नये, काही अपघात होऊ नये, आणि कायदा व सुव्यवस्था शहरात उत्तम राहावी यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री. यशवंत नलावडे हे मार्गदर्शन करून व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला युवकांना देणार आहेत. तसेच तसेच फलटण शहरांमधील युवक व्यावसायिक दुकानदार टपरीधारक यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असेही आवाहन शेवटी पोलीस निरीक्षक श्री. यशवंत नलावडे यांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.