फलटण प्रतिनिधी- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पटलावर खूप मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून महाराष्ट्रामध्ये खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे अनेक नेते मंडळींचा पक्षप्रवेश होताना दिसत आहे
नुकताच इंदापूर येथे झालेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला यांच्या पक्ष प्रवेशा नंतर फलटणमध्ये देखील महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी येथे विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी हातात घेण्याचे ठरविले आहे. म्हणून सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठवून दिला आहे. आता या पार्श्वभूमीवर सोमवार दि.१४ ऑक्टोबर २४ रोजी फलटणला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ.दिपक चव्हाण, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा नुकताच श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
मात्र श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या विधानपरिषद आमदारकीची अद्याप ४ वर्षे बाकी असल्यामुळे श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्येच राहतील असेही संकेत प्राप्त झाले आहेत. मात्र काल श्रीमंत रामराजे यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये श्रीमंत संजीवराजे व त्यांच्या सर्व टीमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे स्वतः श्रीमंत रामराजे यांनी बोलून दाखवले आहे.