ताज्या घडामोडी

फलटण तालुका क्रेडाई पदाधिकारी पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

अध्यक्षपदी युवराज निकम तर सचिवपदी सुहास निंबाळकर यांची निवड

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुका क्रेडाई पदाधिकारी यांचा नुकताच पदग्रहण समारंभ संपन्न झाला यामध्ये फलटण तालुका क्रेडाई अध्यक्षपदी युवराज निकम तर सचिवपदी सुहास निंबाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्रीराम टॉवर येथील संस्थेच्या कार्यालयात हा समारंभ पार पडला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाई महराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रफुल्लजी तावरे आणी क्रेडाई महाराष्ट्र खजिनदार श्री. सुरेंद्रजी भोईटे उपस्थित होते. हा पदग्रहण सोहळा म्हणजे क्रेडाई परिवारासाठी एक पुढच्या दिशेने टाकलेलं नवीन पाऊल असते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर विश्वेश्वराया यांचे प्रतिमेचे पूजन करणेत आले. सुरवातीला मावळते अध्यक्ष श्री. अनिल निंबाळकर यांनी मान्यवर पाहुण्यांचे व उपस्थित सदस्यांचे स्वागत केले आणी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात सन- २०२३-२०२५ चा क्रेडाई फलटणचा कार्यकालीन आढावा सादर केला.


फलटण क्रेडाई यांनी गेल्या २ वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रेडाईच्या महाराष्ट्र शाखेने फलटण शाखेचा गौरव केला.
सन २३-२५ साठी क्रेडाई फलटणला मिळालेल्या प्रथम क्रमांकाचे “बेस्ट सिटी चॅप्टर अवॉर्ड” ची माहिती सर्व उपस्थितांना करून दिली.


त्यानंतर उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
सुरवातीला श्री उमेश भैया ना.निंबाळकर यांनी क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रफुल्लजी तावरे यांचा सत्कार केला तर खजिनदार सुरेंद्र भोईटे यांचा सत्कार राजीव ना. निंबाळकर यांनी केला.
क्रेडाई बारामतीचे उपाध्यक्ष श्री. जाचक साहेब यांचा सत्कार श्री. अनिल निंबाळकर यांनी केला सत्कार समारंभानंतर क्रेडाई फलटण २०२५- २७चा मुख्य पदग्रहण समारंभ पार पडला नूतन अद्यक्ष श्री. युवराज निकम आणी नूतन सचिव श्री सुहास निंबाळकर यांचेकडे मावळते अध्यक्ष श्री अनिल निंबाळकर आणी श्री पृथ्वीराज कदम यांनी आपला पदभार सोपवला श्री. राजेंद्र निंबाळकर उपाध्यक्ष यांनी आपला कार्यभार श्री पृथ्वीराज कदम नूतन उपाध्यक्ष यांना सोपावला श्री अमोल खलाटे खजिनदार यांनी आपले पदाच कार्यभार श्री विशाल राजमाने यांना सोपवला श्री किशोर देवकर यांची सहसचिव पदी कायम नियुक्ती पुढील कार्यकाळासाठी ठेवली गेली वूमन विंगचा पदभार सौ स्वप्ना शहा कनव्हेनर आणी सौ स्वती जाधव को कनव्हेनर यांचेकडे सौ रिजवाना तांबोळी आणी सौ वर्षा खलाटे मॅडम.
यांनी आपला पदभार सुपूर्द केला युथ विंगची सूत्रे श्री केदार करवा यांनी श्री शिवतेज ना.निंबाळकर कनव्हेनर यांना तर श्री. शंभराज बोबडे यांनी को कनव्हेनर युथ विंग म्हणून आपला कार्यभार स्वीकारला या वेळी श्री महेंद्र जाधव यांनी क्रेडाई फलटण स्थापणे पासूनची सर्व संदर्भीय गोष्टींना उजाळा दिला. क्रेडाई महराष्ट्र अध्यक्ष प्रफुलजीनी आपल्या भविष्यातील योजनांचा आढावा मांडतानाच क्रेडाई फलटण युथ व वूमन विंगचे विकासासाठी करणाऱ्या ठोस योजणांची माहिती दिली. क्रेडाई महाराष्ट्र खजिनदार श्री सुरेंद्रजी भोईटे यांनी क्रेडाई महाराष्ट्राचे पुढील उद्धिष्ठे मांडतानाच क्रेडाई बारामतीतील कार्यन्वीत सर्व योजणांची माहिती सादर केली . यावेळी श्री केदार करवा यांनी फलटण युथची क्रेडाई महाराष्ट कडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करताना आपले विचार व्यक्त केले. तर वूमन विंगच्या वतीने आपल्या मागण्या व गरजांची मांडणी सौ वंदनाताई निंबाळकर मॅडम यांनी क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष्यान समोर मांडल्या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष श्री युवराज निकम यांनी आपली क्रेडाई फलटणसाठीची ध्येय धोरणे सर्वांसमोर मांडली शेवटी श्री सुहास निंबाळकर सचिव क्रेडाई फलटण उपस्थितांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला वूमन विंग ,युथ विंग व मेन विंग सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.