ताज्या घडामोडी

फलटणकरांचे आराध्य दैवत श्री संत सदगुरू हरिबाबांचा आज १८३ वा प्रकट दिन

फलटण प्रतिनिधी – फलटणकरांचे आराध्य दैवत, अवलिया सत्पुरुष सदगुरु हरिबाबांचा अश्विन शुध्द १२ म्हणजेच गुरुवार दि.२६/१०/२०२३ रोजी प्रकट दिन संपन्न होत आहे. प्रकट दिनानिमित्त विजयादशमी दिवशी श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांचे शुभ हस्ते सदगुरु हरिबाबांच्या रथाचे पुजन होऊन प्रकट दिन कार्यक्रमास सुरुवात झाली


बुधवार दि.२५ रोजी राञी ८ वाजता कोल्हापुरच्या सुश्राव्य अशा संतकृपा सोंगी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार असुन गुरुवार दि.२६/१०/२०२३ रोजी सकाळी १० वाजुन १० मिनिटांनी राष्टवादी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर यांचे हस्ते रथापुढे श्रीफळ वाढवुन सदगुरु हरिबाबांचा रथ फलटण नगर प्रदक्षिणे साठी निघेल. महतपुरा पेठ-उघडा मारुती मंदिर-छञपती शिवाजी महाराज चौक-सदगुरु ऊपळेकर महाराज मंदिर-ऊमाजी नाईक चौक-शिवशक्ती चौक-श्रीराम मंदिर-गजानन चौक-तेली गल्ली -मारवाड पेठ-बारस्कर चौक-शुक्रवार चौक-शंकर मार्केट-बुरुड गल्ली -पाच बत्ती चौक या मार्गाने रथयाञा जाईल व सायं ७ ला सदगुरु हरिबाबा मंदिर येथे पोहोचल्या नंतर आरती होऊन सर्व भक्तानां महाप्रसाद वाटप करण्यात येईल .
सर्व भावीक भक्तांनी रथ सोहळ्यात सहभागी होऊन सदगुरु हरिबाबा महाराज सेवेचा लाभ घ्यावा असे सदगुरु हरिबाबा देवस्थान ट्रस्ट व रथोत्सव समीतीने आवाहन केले आहे .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.