ताज्या घडामोडी
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कांतीलाल भोसले महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित

फलटण प्रतिनिधी- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव तसेच महात्मा फुले यांना जनतेने बहाल केलेल्या महात्मा पदवी प्रधान समारंभाचे १३७ व्या दिनाचे औचित्य साधून सुजन फाउंडेशन व महात्मा फुले अभियान यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कांतीलाल भोसले यांना “महात्मा फुले गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.




