मुंबई, १९ क्रीडा प्रतिनिधी – (बाळ तोरसकर) ओक्टो; गोवा येथे मध्ये होणार्या ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये सहभागी होणाऱ्या बिलियर्ड्स स्नूकर असोसिएशनच्या महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंसाठी राज्य शिबिर आयोजित केल्याने उत्साह वाढला आहे. हे शिबिर १७ ते २२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दादर क्लब, दादर पूर्व, मुंबई येथील बीएसएएम अकादमी येथे सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे.

गोवा येथे होणाऱ्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार्या बिलियर्ड्स स्नूकर असोसिएशनच्या संघाची केली. पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गोवा येथे २७ ते ३० ऑक्टोबर २०२३ दरम्यान हि स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची निवड झाली आहे
१. स्पर्श फेरवानी (पुरुष) १५ रेड स्नूकर.
२. रोहन जंबुसारिया (पुरुष) १०० अप बिलियर्ड्स.
३. शिवम अरोरा आणि श्री साद सय्यद (पुरुष) ६ रेड स्नूकर टीम इव्हेंट
४. अरांतक्सा सांचीस (महिला) १५ रेड स्नूकर.
५. जियाना रेगो (महिला) ६ रेड स्नूकर.
अशोक शांडिल्य – संघ प्रशिक्षक व सह व्यवस्थापक.
भारतीय बिलियर्ड्स स्नूकर फेडरेशनने वरील संघाला नॅशनल गेम्ससाठी मान्यता दिली आहे.
मा. अध्यक्ष चेराग रामकृष्णन यांनी सचिव देवेंद्र जोशी यांच्यासमवेत शिबिराचे आयोजन करून खेळाला पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. क्षितीज वेदक यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी समन्वय साधला. नॅशनल गेम्ससाठी बीएसएफआय कडून महाराष्ट्राच्या संघाला हिरवा कंदील दिला आहे.
Back to top button
कॉपी करू नका.