ताज्या घडामोडी
लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल व सुयश लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन- लायन अर्जुन घाडगे

फलटण प्रतिनिधी- लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल व सुयश लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने यश कन्स्ट्रक्शनच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाठार ग्रामपंचायत कार्यालय वाठार निंबाळकर तालुका फलटण जिल्हा सातारा येथे करण्यात आले असल्याची माहिती लायन मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचे चेअरमन लायन अर्जुन घाडगे यांनी दिली आहे. तरी वाठार निंबाळकर पंचक्रोशीतील सर्व बंधू भगिनींना कळविण्यात येत आहे की सर्वांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन अर्जुन घाडगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.