क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर मुंबई, १२ डिसेंबर, (क्री. प्र.) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशन (IISF) ने ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे इनडोअर क्रिकेट एशिया कप स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली आहे. सदर स्पर्धा १५ ते २० एप्रिल २०२४ या कालावधीत पार पडणार असल्याची घोषणा इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी जाहीर केले.
या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह, भारत, युएई व सिंगापूर असे चार देश सहभागी होत आहेत. या स्पर्धेत पुरुष गट व पुरुष मास्टर्स (४०+) व महिला गट असे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतात विविध राज्यांत वरील गटाच्या स्पर्धा होणार असून त्यातून त्या-त्या राज्यांच्या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. त्यातून निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत खेळतील. या निवड चाचणीतून भारताचे संघ निवडले जाणार आहेत.
सदर स्पर्धेसाठी बेंगलोर येथे ९ व १० फेब्रुवारी रोजी चाचणी घेऊन भारतीय संघाच्या २४-२४ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडुंचे शिबीर मुंबई, महाराष्ट्र व बेंगलोर, कर्नाटक येथे आयोजित केले जाणार आहे.
मुंबई, महाराष्ट्र येथे होणाऱ्या शिबिराची जबाबदारी महाइंडोअर क्रिकेट असोसिएशनचे (महाराष्ट्र) क्षितिज वेदक, कार्याध्यक्ष व बाळ तोरसकर, सेक्रेटरी यांनी घेतली आहे. अधिक माहितीसाठी बाळ तोरसकर (९८६९१ ३५०८३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान असोसिएशनतर्फे केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.