ताज्या घडामोडी

लायन्स क्लब रिझन-२ राजधानी सातारा रिजन कॉन्फरन्स मोठ्या उत्साहात संपन्न – ला. बाळासाहेब शिरकांडे

फलटण प्रतिनिधी – लायन्स क्लब रीजन-२ ची राजधानी सातारा ही रिजन कॉन्फरन्स अतिशय सुंदर आणि दिमागदार व मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती रिजन चेअरमन  लायन बाळासाहेब शिरकांडे यांनी दिली आहे.

रिजन कॉन्फरन्स-२ संबंधी अधिकची माहिती देताना बाळासाहेब शिरकांडे म्हणाले की, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजवंदना हा कार्यक्रम पार पडला यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख, प्रांताचे प्रांतपाल एम जे एफ लायन भोजराज नाईक निंबाळकर, प्रथम प्रांतपाल एमजेएफ लायन एम. के. पाटील, द्वितीय प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजीवजी नाईक निंबाळकर, डिस्ट्रिक्ट खजिनदार शैलेंद्र शहा इत्यादी मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला यानंतर बाळासाहेब शिरकांडे व प्रांतपाल एम जे एफ लायन भोजराज ना. निंबाळकर यांनी आपली मनोगते थोडक्यात व्यक्त केली.


यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांचे उपस्थित मान्यवरांना प्रेरणादायी असे जबरदस्त व्याख्यान झाले. या व्याख्यानामुळे सर्व लायन्स क्लबच्या सर्व सदस्य मध्ये एक आगळी वेगळी ऊर्जा प्राप्त झाली असल्याची भावना व्याख्यानानंतर अनेक सदस्यांनी व्यक्त केली.


यानंतर रिजन मधील सर्व क्लबचे बॅनर प्रेझेंटेशन करण्यात आले व नंतर बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. व क्वीज ठेवण्यात आली होती. त्या लकी ड्रॉच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास माजी प्रांतपाल एम.जे.एफ लायन पांडुरंग शिंदे, माजी प्रांतपाल पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहित, माजी प्रांतपाल लायन कुशावर्तक जाचक, एमजेएम लायन प्रभाकर आंबेकर, एमजीएफ लायन मिलिंद शहा, एमजेएफ लायन राजेंद्र शहा, झोन चेअरमन एमजेएफ लायन सौ.निलम लोंढे पाटील,

झोन चेअरमन लायन अमितराज शेटे, लायन सुशांत ओव्हाळ, मंगेश एमजीएफ लायन मंगेश दोशी, खुस्पेसर, लायन विजय जमदग्नी, लायन राजेंद्र कासवा, मामा जाचक, एमजेएम लायन सुनीलजी सुतार, पा अमित राज शेटे, बाळासाहेब महामुलकर, फलटण लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन तुषार गायकवाड, फलटण लायन्स आय क्लबचे अध्यक्ष लायन अर्जुन घाडगे, लायन सुहास निकम,

लायन विजय लोंढे- पाटील, लायन नितीनशेठ गांधी, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा लायन सौ. वैशाली चोरमले, सेक्रेटरी लायन सौ. ऋतुजा गांधी, खजिनदार लायन सौ. सुजाता यादव, लायन सौ.मंगल घाडगे, लायन डॉ. सौदामिनी गांधी,

लायन सौ. रेश्मा डेंगे तसेच आपल्या रीजन मधील सर्व क्लबचे अध्यक्ष, सेक्रेटरी,ट्रेझरर आणि लायन सदस्य तसेच प्रांतामधील कॅबिनेट ऑफिसर्स इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.