फलटण प्रतिनिधी- फलटण-राज्य परिवहन(एस.टी.) फलटण आगाराच्या स्थानक प्रमुख(ATS)पदी राहुल वाघमोडे यांची मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रवाशी संघटने तर्फे अध्यक्ष प्रा.शिवलाल गावडे सर यांनी शाल-श्रीफळ-गुलाब पुष्प देऊन स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे याचां सत्कार केला.यावेळी सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे,काका नाळे,वाहक श्रीपाल जैन ऊपस्थीत होते.
प्रवाशी संघटने तर्फे एस.टी.प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे शिवलाल गावडे सर यांनि यावेळी सांगितले. स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे यांनी यापुर्वी मध्यवर्ती कार्यालय,मुबई तसेच धाराशिव विभागात परांडा आगाराचे आगार व्यवस्थापक पदी कामगीरी केली असल्याने अनुभवा मुळे फलटण आगारात कर्मचारी व प्रशासनाचा योग्य तो समन्वय ठेवुन तालुक्यातील प्रवाशांना तत्पर व जलद सेवा दिलि जाईल असे सत्कार प्रसंगी वाघमोडे यांनी प्रतीपादन केले.बसेस ऊपलब्धते नुसार वरीष्टांच्या मार्गदर्शना खाली नविन मार्गावर बसेस सुरु करणार असल्याचे यावेळी वाघमोडे यांनी सांगितले.
Back to top button
कॉपी करू नका.