फलटण प्रतिनिधी- निर्भया पथकाचे काम महिलांवरील अत्याचार, छेडछाड, लैंगिक छळ यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालणे असून निर्भया पथक हे महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणारे एक पोलिस पथक असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाच्या प्रमुख संध्या व्हलेकर यांनी दिली.

महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील मुलांना व मुलींना निर्भया पथकाच्या कामाची माहिती देत असताना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे, उपशिक्षिका सौ. विजया मठपती उपशिक्षका सौ.हेमा गोडसे, व निर्मला चोरमले, पो हवालदार अजित कुमार यादव, फैयाज शेख, प्रयाग सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रिती भोजने, दिपक मदने, दिगंबर लाळगे इ. मान्यंवर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना सौ. पोलीस कॉन्स्टेबल संध्या व्हलेकर म्हणाल्या की, या पथकाची स्थापना दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून आमचे निर्भया पथक हे उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून या पथकाच्या माध्यमातून मुलीं व महिलांवरील होणारे अत्याचार, छेडछाड, लैंगिक छळ यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालणे
महिलांविरुद्ध कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशा घटनांना आळा घालणे
महिलांवरील अन्यायाबाबत विद्यार्थिनींना माहिती देणे
विनाकारण कोणी त्रास देत असल्यास त्याची माहिती देणे व मुलींच्यामध्ये जनजागृती करणे हे असून असे प्रकार झाल्यास मुलींनी कोणाकडे याबाबत तक्रार करावयाची याबाबतची सविस्तर माहिती देणे हे निर्भया पथकाचे काम असून यासाठी या निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगून पुढे त्या म्हणतात मुलींना होणारे पुरुषांकडून बॅड टच गुड टच नेमके कसे असतात तसेच मुला-मुलींनी विना लायसन वाहन चालविणे हा गुन्हा असून असा प्रकार घडल्यास त्यांना ५०० रुपये पासून ते ५ हजार रुपये पर्यंत दंड होऊ शकतो मोबाईल वापरताना अनेक गैरप्रकार घडतात चुकीचे मेसेज मुलींना मुलांच्या कडून केले जातात व ते पुन्हा डिलीट केले जातात मात्र याची सर्व माहिती पोलीस खात्याला मिळवता येते अशा प्रकारापासून मुलांनी दूर राहणे कसे गरजेचे असते अन्यथा आपल्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर आपल्याला पुढे सरकारी व खाजगी नोकरीत मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात असेही शेवटी निर्भया पथकाच्या सध्या व्हलेकर यांनी सांगितले.
मूकबधिर मुलांना व मुलींना ऐकता येत नाही व बोलताही येत नाही. अशा वेळी निर्भया पथकाच्या सध्या व्हलेकर यांनी दिलेल्या माहितीचे सायन लैंग्वेज च्या माध्यमातून रूपांतर मूकबधिर विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ.हेमा गोडसे यांनी रूपांतरित करून समजावून सांगतले.
Back to top button
कॉपी करू नका.