ताज्या घडामोडी

शिक्षक बँक गाळ्यांचा ताबा ५० वर्षांनी पुन्हा बँकेकडे – चेअरमन राजेंद्र बोराटे

बलवंत पाटील यांच्या नेतृत्वात सभासद हिताला प्राधान्य देवून काम

(सातारा/ प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या येथील मुख्य शाखेच्या तळमजल्यावर असणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या व्यापारी गाळ्यांचा ताबा पन्नास वर्षानंतर प्राथमिक शिक्षक बँकेकडे पुन्हा हस्तांतरित होणार आहे. न्यायालयीन लढाईत मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक बँकेच्या बाजूने निर्णय दिल्याची माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी दिली. बँक व सभासदांच्या हितासाठी आम्ही बांधील असून आमचे नेते परिवर्तन पॅनल चे प्रमुख बलवंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही सभासद हिताला प्राधान्य देत असल्याचे श्री. राजेंद्र बोराटे यांनी नमूद केले.

डबल शिफ्ट चा फटका बँक व सभासदांना
सन २००१ पासून बँकेची सातारा शाखा दोन सत्रात सुरू केली. त्यानंतर आणखी ६ शाखा टप्याटप्याने दोन सत्रात सुरु केल्याने गेल्याने दहा-अकरा वर्षात बँकेच्या अनावश्यक खर्चात भरमसाठ वाढ झाल्याचे सांगून चेअरमन श्री.राजेंद्र बोराटे म्हणाले, या डबल शिफ्ट मुळे बँक व सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हा निर्णय बदलण्यासाठी रिझर्व बॅंकेकडेही आम्ही पाठपुरावा केला. गेल्या तीन मीटिंगमध्ये हा विषय अजेंड्यावर घेऊन सातत्याने त्याचा पाठपुरावा केल्याने जानेवारी २०२८ च्या बैठकीत हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवरील होणाऱ्या खर्चात बचत होणार असून बँकेचे दरवर्षी किमान २ ते ३ कोटी रुपये वाचणार आहेत. त्याचा अनुकूल परिणाम भविष्यात व्याजदर कमी होण्यासाठी निश्चित होईल. या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व सभासदांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे – चेअरमन श्री.राजेंद्र बोराटे

शिक्षक बँकेच्या तळमजल्यातील चार  गाळे १९७४ मध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. सातारा शहरातील मध्यवर्ती व प्रमुख व्यापारी ठिकाण असलेल्या पोवई नाका येथील बँकेच्या मुख्य कार्यालया इमारतीत स्व मालकीचे गाळे आहेत. गाळाधारक त्यांचा ताबा सोडायला कित्येक वर्ष तयार नव्हते. याबाबतचा दावा 2004 सालापासून सुरू होता. बँकेने या महत्त्वाच्या बाबीत लक्ष घालून सभासद हिताची बाजू बळकटपणे मांडण्यासाठी जेष्ठ वकिलांची नेमणूक केली होती. सतत चा पाठपुरावा करून दि. २२ जानेवारी २०२४ रोजी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित गाळे बँकेच्या ताब्यात परत देण्याचा आदेश पारित केले आहेत. सध्याच्या भाडेकरूना जागा खाली करण्यासाठी ३० एप्रिल २०२४ पर्यंत मुदत दिलेली आहे व या बाबत चे प्रतीज्ञापत्र संबंधित १ ते ४ गाळेधारकांनी दि ६ फेबुवारी २०२४ रोजी उच्च न्यायालय, मुंबई येथे सादर केलेले आहे. त्यामुळे १ मे २०२४ पासून या गाळ्यांचा लाभ सेवानिवृत्त सभासद व इतर सभासद यांना बँकिंग कामकाजासाठी होणार असल्याचे चेअरमन श्री.राजेंद्र बोराटे म्हणाले.

गेल्या सात महिन्यांच्या माझ्या चेअरमन पदाच्या कालावधीत आमचे नेते श्री. बलवंत पाटील यांच्या दूरदृष्टीने व शिक्षक संघाचे राज्य नेते श्री. संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे राज्य नेते श्री. उदय शिंदे, अखिल भारतीय दोंदे संघटनेचे राज्य सचिव श्री. दीपक भुजबळ तसेच शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत यादव, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वंभर रणनवरे, व्हा. चेअरमन श्री. विजय बनसोडे व सर्व सन्मानीय संचालक यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलो आहोत. परिवर्तन पॅनल चे प्रमुख श्री. बलवंत पाटील यांना आदर्श मानून मी पारदर्शक व काटकसरीच्या कारभारासाठी झटत आहे. जेणेकरून व्याजदर कमी करता येऊन त्याचा लाभ सर्व सभासदांना होईल. जुलै २०२३ मध्ये चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यावर तात्काळ बँकेचे मोबाईल ॲप (IMPS सुविधा) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या डिजिटल बँकिंग युगात सर्व सभासदांना मोबाईलवरून व्यवहार सुलभपणे करणे या ॲपमुळे शक्य झाले. आता आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता कमी झाली आहे.
गतवर्षी सभासदांच्या मासिक वर्गणीत वाढ करण्यात आली होती. अगोदर ७०० रुपये असणाऱ्या मासिक वर्गणीत वाढ करून ती १३०० रुपये करण्यात आली होती. परंतु या निर्णयामुळे सभासदा मध्ये नाराजीचा सूर होता. कराड, फलटण, खटाव, माण मधील सभासदांनी वर्गणी कमी करण्याबाबत ची निवेदने बँकेच्या अनेक शाखांमध्ये दिली होती. त्यामुळे १० फेब्रुवारी २०२४ च्या संचालक मंडळ मासिक मिटिंगमध्ये सभासद वर्गणी पुन्हा १३०० रुपयांवरून ७०० रुपये करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमचे नेते श्री. बलवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांचे हित जपण्यासाठी आम्ही बांधील आहोत , असे चेअरमन श्री.राजेंद्र बोराटे म्हणाले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.