ताज्या घडामोडी

आशिया कप टी२० – २०२५” च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा केला दणदणीत पराभव

आशिया कप स्पर्धेत भारत विजयी ५ विकेट राखून

फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – दुबई येथे खेळल्या गेलेल्या आशिया कप चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा तब्बल ५ विकेट राखून दणदणीत पराभव केला व जगाला दाखवून दिले मैदान कोणतेही असो विजयी आम्हीच होणार हे पाकिस्तान संघाला दाखवून दिले.

आशिया चषक सामन्यांमध्ये साखळी फेरीमध्ये तब्बल दोन वेळा पाकिस्तानी संघाला धूळ चालण्यास भारत यशस्वी ठरला होता. मात्र दुबईत खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजी घेतली त्यांनी घेतलेला निर्णय ही सार्थ ठरला मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सलामीच्या जोडीने आक्रमक खेळी करत एक आश्वासक धावसंख्या उभी करणार असे वाटत असतानाच शेवटच्या २५ धावांमध्ये तब्बल पाकिस्तानी संघाचे ५ फलंदाज बाद झाले अक्षरशः भारतीय फिरकीने म्हणजे कुलदीप यादव, अक्षर पटेल, व वरून चक्रवर्ती यांनी जबरदस्त गोलंदाजी करून पाकिस्तानला चांगली धावसंख्या करण्यापासून रोखले त्यातच शेवटच्या षटकात बुमराह २ विकेट घेऊन बहुमूल्य साथ दिली व अखेर १४६ धावांमध्ये पाकिस्तानचा संघ गारद झाला.


नेहमीप्रमाणे भारताची सलामी जोडी अभिषेक शर्मा व शुभमन गिल मैदानात उतरले यांच्याकडून चांगली अपेक्षा असतानाच एक जोरदार फटका मारण्याच्या नादात अभिषेक शर्मा केवळ ५ धावावर बाद झाला यानंतर लगेचच सूर्यकुमार यादव ही झटपट बाद झाला अशातच नेहमीप्रमाणे अंतिम सामन्यात भारत दबावाखाली खेळतो असे वाटत असतानाच शुभमन गिलने ही आपली विकेट गमावली व २५ धावावर भारताचे ३ जबरदस्त फॉर्ममध्ये असणारे खेळाडू झटपट बाद झाले. मात्र तणावपूर्ण क्षणात भारतीय संघाने शांत डोके ठेवून आणि योग्य क्षणी आक्रमण करत जगाला पुन्हा एकदा दाखवून दिले की, आमचा संघ कोणा एकट्यावर अवलंबून नाही तर वेळ आल्यानंतर आम्ही सर्वच विजयासाठी चांगले खेळून व विजय मिळवून देऊ शकतो व तिलक वर्मा व संजू सॅमसन यांनी भारताची पडझड रोखली व चांगली भागीदारी करीत असतानाच संजू सॅमसन हा एक चांगला फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला यानंतर आलेला शिवम दुबे व तिलक वर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करून तिलकने आपले अर्धशतक पूर्ण केले.

अगदी विजयाच्या समीप आल्यानंतर फटकेबाजीच्या नादात शिवम दुबे बाद झाला अखेरच्या षटकात ६ बॉल आणि १० धावा आवश्यक होत्या. पहिल्याच चेंडूवर वर्माने षटकार ठोकला व रिंकू सिंग यांनी विजयाचा चौकार ठोकून भारताने ५ विकेट राखून पाकिस्तानवर विजयी मिळवता आला व सर्व भारतभर एकच जल्लोष झाला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button