फलटण प्रतिनिधी- फलटण तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय श्रीमंत शिवाजी राजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या स्मृतीस केले अभिवादन
यावेळी श्रीमंत रामराजे म्हणतात की मला राजकारणात येण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम आदरणीय शिवाजी राजे यांनी केले ते फलटण तालुक्याचे माजी आमदार होते. विधानसभेत काम करण्यासाठी त्यांना फार कमी कालावधीत मिळाला तरी देखील सातारा जिल्ह्यातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना म्हणजे श्रीराम सहकारी साखर कारखाना या संस्थेच्या उभारणीत व जडणघटनीत अत्यंत मोलाचे काम श्रीमंत शिवाजीराजे यांचे होते.
श्रीमंत मालोजीराजे (राजेसाहेब) श्रीमंत शिवाजीराजे ही खूप मोठ्या मनाची माणसं होती. त्यांच्या आदर्शावर व संस्कारावर आज आम्ही मार्गक्रमण करीत राहणे हेच खरे त्यांना अभिवादन होय.
Back to top button
कॉपी करू नका.