ताज्या घडामोडी

सरकारकडून होणाऱ्या भेद भावाकडे आ. बच्चू कडू यांनी वेधले सभागृहाचे लक्ष ; सरकारची केली कानउघडणी

(फलटण /प्रतिनिधी)- सरकारकडून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये समाजातील उपेक्षित वंचित असणारा घटक म्हणजे आमचा दिव्यांग बांधव व देशासाठी जिवाची बाजी देणारे माजी सैनिक व शहीद परिवारांच्या बाबतीत शासनाच्या धोरणात बदल आवश्यक असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेमध्ये सांगितले यावेळी अक्षरशा आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर घणाघात करून ते म्हणाले दिव्यांग खेळाडू व सर्व साधारण खेळाडू यांच्यात जो दुजाभाव सुरू आहे. जागतीक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणार्‍या सोबत बक्षिसात जो भेदभाव सुरू आहे.

याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले  बच्चू कडू म्हणतात देशाच्या सीमेवर आपले सैनिक सर्व आयुष्य खर्ची घालत असतात त्यामुळे सैनिकांसाठी आपल्या राज्यांनी वेगळा कायदा करून त्यांना जमीन देणे गरजेचे असून दिव्यांगासाठी आपण गेले कित्येक वर्षापासून १५०० रुपये देत आहोत ही १५०० रुपये रक्कम खूप कमी असून आता दिव्यांगांना महिन्याला ४ हजार रुपये देणे गरजेचे असून दिव्यांगासाठी शासनाच्या बजेटमध्ये ५ टक्के तरतूद केली आहे. मात्र ही तरतूद अंमलात येत असताना कुठेही दिसत नाही.

सरकारी अधिकारी याची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. अशी खंत व्यक्त करून आमदार बच्चू कडू काय म्हणतात आपण त्यांच्याच भाषणातून जाणून घेऊ यात समान काम समान वेतन हा नियम सर्वासाठी आहे, परंतु याचे पालन होताना दिसत नाही. एसटी कर्माचारी हा तुटपुंज्या मानधनात काम करत आहेत . याप्रश्नासंबंधी प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी सभागृहाचे लक्ष वेधले या वेळी आमदार बच्चू कडू यांनी अक्षरशा एसटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत होणाऱ्या अन्यायाविरोधात सरकारला नुसते धारेवरच धरले नाही तर अक्षरशः त्यांची लाजच काढली .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.