फलटण प्रतिनिधी – इंदापूर जि.पुणे येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे अभिजीत सोनवणे यांची फलटणच्या निवासी नायब तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीही अभिजित सोनवणे यांनी फलटण येथील उपविभागीय कार्यालय फलटण येथे अव्वल कारकून म्हणून काम पाहिले आहे .तर खंडाळा, सातारा, फलटण याठिकाणी शिरस्तेदार म्हणून सेवा बजावली आहे. नुकतीच फलटण येथून अभिजीत सोनवणे यांची इंदापूर येथे नायब तहसीलदार म्हणून बदली झाली होती आता पुन्हा नव्याने फलटण महसूल कार्यालयांमध्ये निवासी नायब तहसीलदार म्हणून ते कामकाज पाहणार आहेत अभिजीत सोनवणे हे अत्यंत शांत, मनमिळावू व कार्यक्षम अधिकारी म्हणून सर्वत्र परिचित आहेत
सोनवणे यांची फलटण येथे निवासी नायब तहसीलदारपदी बदली झाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.